बावनकुळे औरंगजेबला जावयाप्रमाणे म्हणतात; अमोल मिटकरी यांची टीका

बावनकुळे औरंगजेबला जावयाप्रमाणे म्हणतात; अमोल मिटकरी यांची टीका

| Updated on: Jan 07, 2023 | 7:30 AM

बावनकुळे यांच्या औरंगजेबजी या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी यांनी यांच्या आधी त्यांनी माफी मागावी असा इशारा दिला होता. तर आता बावनकुळे हे औरंगजेबला जावयाप्रमाणे म्हणतात असा टोला लगावला आहे.

अकोला : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्ष नेते यांच्यावर वादग्रस्त विधानावरून जोरदार टीका केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने राज्यभर रान उठनलं. आणि आता अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर वांरवार टीका होताना दिसत आहे. यादरम्यान बावनकुळे यांनी औरंगजेबचा औरंगजेबजी असा उल्लेख केला आणि ते अडचणीत आले.

बावनकुळे यांच्या औरंगजेबजी या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी यांनी यांच्या आधी त्यांनी माफी मागावी असा इशारा दिला होता. तर आता बावनकुळे हे औरंगजेबला जावयाप्रमाणे म्हणतात असा टोला लगावला आहे.

औरंगजेबजी हे वक्तव्य आता बावनकुळेंसाठी अवघड जागेचं दुखणं झालं आहे. त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर आमच्या पक्षा३त गद्दी जमवावी लागत नाही. जी लोक एकिकडे मुस्लिमांना शिव्या घालतात आणि दुसरीकडे मजार आणि दर्ग्यावर जातात, अशा लोकांनी अजित पवार यांना सांगू नये.

Published on: Jan 07, 2023 07:30 AM