Mumbai Congress | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून मोठ्या नेत्याला हटवलं? अध्यक्षपदाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्याकडे
याच दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून खांदेपालट झाले आहे. येथे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या अनुशंगाने मार्चे बांधणी केली जात आहे. सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागले आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून खांदेपालट झाले आहे. येथे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाई जगताप यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी महिलाकडे देण्यात आल्याने काँग्रेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published on: Jun 10, 2023 07:26 AM
Latest Videos