Bachchu Kadu स्पष्टच म्हणाले, ‘ब्रह्मदेव खाली आले तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही’
VIDEO | आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मला मंत्रीपदाची गरज नाही. मी दावा सोडलेला आहे. 2024 पर्यंत ब्रह्मदेव जरी खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार नाही'
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | “मंत्री पदापेक्षा मला मंत्रालय भेटलं. दिव्यांगण मंत्रालय भेटले, मंत्रिपदापेक्षा जास्त भेटलं. आम्ही मागितलेला एक डोळा आणि आम्हाला मिळाले दोन डोळे. मला मंत्रीपदाची गरज नाही. मी दावा सोडलेला आहे. 2024 पर्यंत ब्रह्मदेव खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार नाही”, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू स्पष्टच म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, महायुतीची 1 तारखेला महायुतीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं आपल्यालाही निमंत्रण आले आहे. पण या बैठकीला आपण जाऊ शकणार नाही, “माझं ठाण्याला दिव्यांग अभियान आहे. त्यामुळे मी जाऊ शकणार नाही. आमचं अभियान सर्वात मोठं, सामान्य लोकांसाठी आहे. त्याचं स्थान सोडून बैठकीसाठी जाणं चांगलं नाही”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. तलाठी भरतीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीसारखे प्रकार उघडकीस आले. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “स्पर्धा परीक्षेबाबत पेपर फुटीचा कायदा झाला पाहिजे. शेतीला भाव नाही. शेतकऱ्याच्या मुलाला वावही नसेल, त्यात पेपर फुटी होत असेल तर कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात सरकार बदनाम होतं. पेपर फुटीचा कायदा इतका कडक झाला पाहिजेल की मृत्यू दंड होतो, त्याप्रमाणे त्याच्यावर दंड झाला पाहिजे. चाकूने मारलेला माणूस दिसतो. मात्र परीक्षेने मारलेला माणूस दिसत नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.