अमरावतीमध्ये ‘या’ १७ अटी-शर्तींसह बच्चू कडू यांच्या ‘जन एल्गार’ मोर्चाला पोलिसांकडून परवानगी
VIDEO | शेतकरी, आणि विविध प्रश्नासंबधित बच्चू कडू यांचा आयुक्त कार्यालयावर जन एल्गार मोर्चा धडकणार, पोलिसांकडून कोणत्या अटी-शर्ती?
अमरावती, ९ ऑगस्ट २०२३ | प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावतीत जन एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे. आज दुपारी १२ वाजता बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील या मोर्च्याला सुरूवात करण्यात आली. संतगाडगे महाराज समाधीपासून ते जिल्हाधिकारी आणि विभागीय कार्यालयावर येऊन हा मोर्चा धडकणार आहे. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 17 अटी शर्तीसह आमदार बच्चू कडू यांच्या एल्गार मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि घरकुलांच्या प्रश्नावर बच्चू कडू हे आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकणार आहे. दरम्यान, जन एल्गारमध्ये सहभागी असलेल्या मोर्चेकरांना 17 अटींचे पालन करावे लागणार आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच न्यावा लागणार आहे आणि या मोर्चात कुठलेही शस्त्र बाळगता येणार नाही तर पोलिसांनी दिलेल्या प्रत्येक सूचनाचे पालन मोर्चेकऱ्यांना करावे लागणार आहे.