अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात घमासान, जितेंद्र आव्हाड यांची सडकून टीका
अजित पवार यांच्या विधानाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चांगलंच घमासान पाहायला मिळालं. बारामतीमध्ये तुम्हाला काही लोकं भावनिक करतील. शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील मात्र त्यांची शेवटची निवडणूक कधी येईल काही माहिती नाही, अजित पवार यांच्या या वक्तव्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : अजित पवार यांच्या विधानाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चांगलंच घमासान पाहायला मिळालं. बारामतीमध्ये तुम्हाला काही लोकं भावनिक करतील. शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील मात्र त्यांची शेवटची निवडणूक कधी येईल काही माहिती नाही, अजित पवार यांच्या या वक्तव्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ज्या शरद पवार यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांचं मरण चिंतत आहात, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ‘कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, आमकच आहे, तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.’, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. तर यावर जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली. तुम्ही जर शरद पवार कधी मरताय याची वाट पाहत असाल तर तुमच्या सारखं कृतघ्न कुणी नाही. शरद पवार कधी मरताय, त्यांची ही शेवटची निवडणूक असेल का? शरद पवार तुम्हाला भावनिक करतील…अरे काय बोलताय? ज्यांनी तुम्हाला वाढवलं त्यांच्याबद्दल असे विचार करताय.