‘एकही है लेकीन काफी है’, भर सभेत राज ठाकरे यांनी ऐकवला छोले चित्रपटाचा डायलॉग
VIDEO | ठाण्यातील भरसभेत राज ठाकरे आमदार राजू पाटील यांची तारीफ करतात तेव्हा..., बघा व्हिडीओ
ठाणे : राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, मग मतं का नाही पडत, असं सातत्याने विचारले जाते, यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत सांगितले, मग जे १३ आमदार आले होते ते काय सोरटवर आले होते का? भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती होतेच ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. असे म्हणत भाजपला राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला ते म्हणाले भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे आज भरती सुरूये ओहटी येणार, येऊ शकते कोणी थांबवू नाही शकत… मनसे पक्षाची बाजू आज विधानभवनात एकटा मांडत आहे. त्यामुळे एकही काफी है, म्हणत भर सभेत राज ठाकरे यांनी मनसेचा आमदार राजू पाटील यांची तारीफ केले. आज मनसेचा १७ वा वर्धापन दिन असून या निमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते.