खासगी कंपन्यांकडून MPSC विद्यार्थ्यांची लूट? राष्ट्रवादीच्या नेत्याची आगपाखड

खासगी कंपन्यांकडून MPSC विद्यार्थ्यांची लूट? राष्ट्रवादीच्या नेत्याची आगपाखड

| Updated on: Aug 08, 2023 | 7:29 AM

यावरूनच त्यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशानात हा विषय लावून धरला होता. त्यावेळी त्यांनीं, UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरला आहे. यावरूनच त्यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशानात हा विषय लावून धरला होता. त्यावेळी त्यांनीं, UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? असा सवाल सरकारला केला होता. त्यानंतर आता स्पर्धा परीक्षांच्या शुल्कावरून आणि खासगी कंपन्यांवरून पुन्हा एकदा रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट खासगी कंपन्यांकडून MPSC विद्यार्थ्यांची लूट सुरू असल्याचं म्हणत आगपाखड केली आहे. तसेच हा आरोप करताना MPSC विद्यार्थ्यांकडून आकारली जाणारी फी कमी करा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Aug 08, 2023 07:29 AM