Rohit Pawar : एखाद्या बंद खोलीमध्ये…, बोरवणकर यांच्या अजितदादांवरील आरोपांवर रोहित पवार स्पष्टच म्हणाले
VIDEO | माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले अन् महाराष्ट्राच्या राजकारणात वाद, रोहित पवार थेट म्हणाले, एखाद्या बंद खोलीमध्ये काही चर्चा झाली असेल ती आम्हाला सांगता येऊ शकत नाही पण...
पुणे, १७ ऑक्टोबर २०२३ | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलं आहे. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांच्याकडून हे गंभीर आरोप करण्यात आले आहे. या पुस्तकातील एका टिपण्णीवरून वाद निर्माण झाला आहे. यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. एखाद्या बंद खोलीमध्ये काही चर्चा झाली असेल ती आम्हाला सांगता येऊ शकत नाही. मात्र यामध्ये अनेक पैलू असतील. हळूहळू लोकनेत्याची ताकद कशी कमी करायची. यासाठी भाजप पक्ष अनेक वेळा प्रयत्न करत असतात. ही जी घटना आहे ती अचानकपणे समोर आली आहे. त्यातून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? असाही प्रश्न सध्या उपस्थित होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
Published on: Oct 17, 2023 05:08 PM
Latest Videos