‘डोक्यावर हात ठेवला म्हणजे निवडून याल, हे दिवस गेले’, शहाजी बापू पाटील यांचा कोणावर निशाणा?
VIDEO | आंबेगाव तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी शहाजी बापू पाटील यांचा रोख नेमका कोणावर?
पुणे : काय झाडी काय डोंगर या आपल्या विधानामुळे चर्चेत असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या तीस वर्षाच्या विकास कामाची तुलना केलीय. मी चार वर्षात सांगोल्यात दिलीप वळसे पाटील यांच्यापेक्षा अधिकचा विकास केला असल्याचं शहाजी बापू यांनी सांगितले. तीस वर्षांची तुलना आपल्या चार वर्षाच्या आमदारकीशी करताना जर तसे घडले नसेल तर येणारी आमदारकी मी लढवणार परंतु ही निवडणूक सांगोल्यातून की आंबेगाव मधून हे स्पष्ट बोलनं टाळत शहाजी बाप्पू यांनी संभ्रमावस्था निर्माण केलीय, यावेळी बोलताना शहाजी बाप्पू यांना वळसे पाटलांना डिवचत कुणी डोक्यावर हात ठेवला म्हणजे निवडून येण्याचे दिवस आता निघून गेले आता कष्टाशिवाय निवडून येणे कठीण झाल्याचं सांगितल..

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
