सुमनताई अन् रोहित पाटील यांचं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, काय आहे मागणी?
VIDEO | टेंभू सिंचन योजनेमध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर सर्व कार्यकर्त्यांसह हे बेमुदत उपोषण आजपासून सुरू होणार आहे
सांगली, २ ऑक्टोबर २०२३ | टेंभू सिंचन योजनेमध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर आर पाटील आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यांचा मुलगा रोहित पाटील आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन आमदार सुमनताई पाटील यांचे हे उपोषण सुरू होणार आहे. वारंवार मागणी करून ही प्रशासनाकडून पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात येत नसल्याने आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी राज्य सरकार विरोधात थेट बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत टेंभू योजनेत समावेश होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार देखील आमदार सुमनताई यांनी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.