MNS Gudi Padwa : बाळासाहेबांच्या ‘त्या’ सूचना तरीही राज ठाकरेंकडून झळकले गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स, का होतेय चर्चा?
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 : दादार येथील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवर्षी गुढीपाडवा मेळावा असतो. यंदाही या मेळाव्याचे आयोजन आहे. मात्र त्यापूर्वी बॅनर्सची होतेय चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मनसे पक्ष स्थापनेच्या वेळी आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी कोणत्याही बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले नव्हते. कारण “माझे फोटो पोस्टर्सवर वापरायचे नाही”, अशा सूचना बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो कुठेही वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यासोबत राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचेही फोटो या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. येत्या ३० तारखेला शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसेकडून बाळासाहेबांच्या फोटोसह राज ठाकरेंचे फोटो असणारे बॅनर्स मुंबईत लावण्यात आल्याचे पाहायला मिळतंय.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
