Video : नाहीतर पोलीस चौकीसमोर हनुमान चालिसा म्हणणार- हेमंत संभूस

Video : नाहीतर पोलीस चौकीसमोर हनुमान चालिसा म्हणणार- हेमंत संभूस

| Updated on: May 07, 2022 | 2:40 PM

मशिदींवरील भोंगे (Loudspeaker) उतरवण्याची ग्वाही द्या, नाहीतर आम्ही मशिदींसमोरच हनुमान चालिसा वाचवणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी याबाबत माहिती दिली. याविषयी पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये मशिदींतील लाऊडस्पीकर काढल्यानंतर ते रस्त्यावर ठेवा, […]

मशिदींवरील भोंगे (Loudspeaker) उतरवण्याची ग्वाही द्या, नाहीतर आम्ही मशिदींसमोरच हनुमान चालिसा वाचवणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी याबाबत माहिती दिली. याविषयी पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये मशिदींतील लाऊडस्पीकर काढल्यानंतर ते रस्त्यावर ठेवा, असे म्हटले आहे. मौलानांचे संमतीपत्र घ्या अन्यथा मनसे पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa)वाजवून निषेध नोंदवेल. एकावेळच्या अजानचा विषय नाही, पाचवेळा अजान होते. भोंगे बंद अवस्थेत असतील तर तशास्वरुपाचे स्पष्टीकरण मशिदींकडून पोलिसांनी घ्यावे, अन्यथा आंदोलन करू. कितीही नोटीस दिली, तरी आम्ही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.

Published on: May 07, 2022 02:40 PM