खरा दसरा मेळावा कुणाचा? शिंदे अन् ठाकरे गटाच्या मेळाव्यावर मनसे नेत्याचं भाष्य

खरा दसरा मेळावा कुणाचा? शिंदे अन् ठाकरे गटाच्या मेळाव्यावर मनसे नेत्याचं भाष्य

| Updated on: Oct 24, 2023 | 6:26 PM

VIDEO | मुंबईत आज दोन दसरा मेळावा होत आहे. एक शिवाजीपार्क म्हणजेच शिवतीर्थावरील ठाकरे गटाचा आणि दुसरा आझाद मैदानावरील शिंदे गटाचा दसरा मेळावा. मात्र दसरा मेळावा नक्की कोणाचा? मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे.

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | मुंबईत आज दोन दसरा मेळावा होत आहे. एक शिवतीर्थावरील ठाकरे गटाचा आणि दुसरा आझाद मैदानावरील शिंदे गटाचा दसरा मेळावा. मात्र दसरा मेळावा नक्की कोणाचा? कुणाची खरी शिवसेना यावरून अद्याप आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी शिंदे-ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनता कधी नव्हे इतकी संभ्रमावस्थेत आहे. प्रत्येक जण म्हणतंय विचारांचा वारसा, विचारांचं सोनं आम्ही पुढे घेऊन जातोय, पण असं कुठेच दिसत नाही. सगळाच पोरखेळ सुरू आहे. एकमेकांवर टीका करणे एवढेचं काम केले जात आहे. हे जनतेलाही आवडत नाही. एकाच नावाचे दोन पक्ष असे महाराष्ट्रात चार पक्ष काम करतायत आणि एकमेकांवर टीका करण्यासाठीच हे मेळावे होत आहेत. विचार घेऊन जाणारा पक्ष लोकांना माहिती आहे, त्यामुळे या मेळाव्यातून जास्त काही साध्य होणार नाही. तर जनता निवडणुकीतून नक्की उत्तर देईल, असेही त्यांनी म्हटलंय.

Published on: Oct 24, 2023 06:26 PM