AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादरच्या जलतरण तलावात मगर अन् मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, म्हणाले...

दादरच्या जलतरण तलावात मगर अन् मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, म्हणाले…

| Updated on: Oct 03, 2023 | 6:37 PM

VIDEO | दादर येथील शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मगरीचं पिल्लू आढळल्याची घटना समोर आली. यानंतर जलतरणपटूंमध्ये एकच खळबळ उडाली, या घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय दिली संतप्त प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | दादर इथल्या महानगरपालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलाव इथे पहाटे साडेपाचच्या सुमारास अडीच फुट मगरीचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना माहित पडताच मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकारी यांनी या ठिकाणी धाव घेतली. या जलतरण तलावाच्या बाजूला असणाऱ्या एका खाजगी प्राणी संग्रहालयातूनच ही मगर जलतरण तलावात आले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. तर प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाने आमचा आणि मगरीचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी जलतरण तलाव येथे पोहोचले होते आणि आणि झालेल्या घटनेचा अधिक तपास केला.

या प्राणीसंग्रहालयात एक अजगर बेकायदेशीर रखवालीत सापडल्याने वनविभागाने ताब्यात घेतलाय. संदीप देशपांडे यांनी केलेले आरोप मात्र मिनी प्राणीसंग्रहालयाचे मालक युवराज मोघे यांनी फेटाळून लावलेत. आमच्याकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या असल्याचे त्यांनी सांगितलंय.

Published on: Oct 03, 2023 06:37 PM