ठाकरे गटाला शिवसेना नाव, चिन्ह गेल्याची चिंता नाही तर…, मनसेचा उद्धव ठाकरे गटाला चिमटा
VIDEO | बाळासाहेब ठाकरे यांच्या 'त्या' वाक्याची आठवण करून देत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिला उद्धव ठाकरे यांना सल्ला
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. अशातच शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच की?? असे ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढला आहे. संदीप देशपांडे यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह गेल्याची चिंता नाही तर त्यांनी शिवसेनेची मालमत्ता जाण्याची चिंता असल्याचा खोचक टोलाही संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरीस एक वाक्य म्हटले होते, पैसा येतो पैसा जातो पण गेलेले नाव पुन्हा कधीच परत मिळवता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या या वाक्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून देत त्यांनी पुन्हा एकदा सल्ला दिला आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
