Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्बंध उठवा, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, Sandeep Deshpande यांचा सरकारला इशारा

निर्बंध उठवा, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, Sandeep Deshpande यांचा सरकारला इशारा

| Updated on: Jul 15, 2021 | 10:42 AM

सरकारने जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, वेठीस धरु नये, आपसातली लफडी बाजूला ठेवावी, रुग्णसंख्या कमी झालीये. जनतेला वेठीस का धरता, निर्बंध का उठवत नाहीत. विषय आक्रमक हेण्याचा नाही, सरकारला परिणाम भोगावे लागणार, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेल यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय कि रेलिवे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचंय. आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा, एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे. नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दिड वर्षात काय केलं, ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी. लसीकरण झालं तरी निर्बंध असेल तर लसीकरणाचा उपयोग काय?, या सरकारने काय कामं केली, शाळेच्या फीचा प्रश्न, व्यापारी नाराज, हफ्तेखेरी करतंय हे वसूली सरकार. दुकानं बंद, रेल्वे बंद, लोक घरात वेठीस धरण्याचं काम होतंय, मनपा निवडणुकांसाठी मनसेची तयारी सुरू आहे, जनतेवर कोवीड काळात केलेल्या कामाचा जनतेच्या मनावर मोठा परिणाम आहे, राज ठाकरे स्वता लक्ष देत आहेत, असंही ते म्हणाले.