वसंत मोरेंची ठाण्यातून डरकाळी !

वसंत मोरेंची ठाण्यातून डरकाळी !

| Updated on: Apr 12, 2022 | 7:27 PM

पुण्यात कोरोना काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत. त्यावेळी फक्त मनसे काम करत होती.

ठाणे : वसंत मोरेंची ठाण्यातून डरकाळी ! पुण्यात कोरोना (Corona) काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत. त्यावेळी फक्त मनसे (MNS) काम करत होती. तुम्ही त्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. सगळे नेते आपल्या घरात बसलेले असताना मनसे पदाधिकारी रस्त्यावर होते. एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने (Maharashtra)ऐकला. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा मनसैनिक जात होता. सरकार जी कामं करत नव्हते ती कामं आम्ही करत होतो. आमचा साईनाथ 5- 5 हजार लोकांना जेवण देत होता. आम्ही दवाखाने उभे केले.