बाकीच्या पक्षांना हाणायचे म्हणजे हाणायचे, राज ठाकरे यांनी मुंबई मनपाचं रणशिंग फुकलं

| Updated on: Mar 05, 2022 | 10:03 PM

मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. मात्र, निवडणूक कधी लागणार याबाबत अद्याप कुठलाही पक्षाने ठामपणे काही सांगितलेलं नाही. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कांदिवलीतून एकप्रकारे निवडणुकीचं रणशिंगच फुंकल्याचं पाहायला मिळालं. 

निवडणुकांबाबत तर राज ठाकरेंनी भाष्य केलेच, मात्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यंदा निर्धार करा, इतर राजकीय पक्षांना हाणायंच म्हणजे हायणायचं… असं वक्तव्य राज ठाकरेंनी केल्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मतपेटीत मैदानासारखा प्रतिसाद मिळत नसला तर त्यांना ऐकण्यासाठी हजारोंची सख्या जमते. त्यामुळे राज ठाकरेंचे भाषण नेहमीच तडाखेबाज असते. आजही त्यांनी बोलताना मनसेच्या खळ्ळखट्याकची ओळख पुन्हा आठवण करून दिली आहे. त्यामुळे मनसे निवडणुकीत जोमाने उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार, मैत्री आणि किस्से; श्रीनिवास पाटील यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा
Special Report | ज्यांच्या भरवश्यानं यूक्रेननं दंड थोपटले, त्यांनीच यूक्रेनला पाठ दाखवली