मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्यावर रविवारी शस्त्रक्रिया पार पडणार

मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्यावर रविवारी शस्त्रक्रिया पार पडणार

| Updated on: Jun 17, 2022 | 12:23 PM

राज ठाकरे उद्या लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरे उद्या लिलावती रूग्णालया हिप बोन शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार आहेत.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray)  लीलावती (Lilavati) रूग्नालयात शस्त्रक्रिया होणार आहे. राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. पण गेल्यावेळी कोरोनाचे डेड सिल्स सापडल्याने तेव्हा शस्त्रक्रिया झाली नाही. पण, आता राज ठाकरे उद्या लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरे उद्या लिलावती रूग्णालया हिप बोन शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार आहेत. गेल्या वेळी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. रविवारी ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

Published on: Jun 17, 2022 12:23 PM