राज अन् उद्धव ठाकरे एकत्र आल्यास ‘मुंबई’ कोणाची? ठाकरे बंधूंचं एकत्र येणं सत्ताधार्यांसाठी डोकेदुखी ठरणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का? हे राज ठाकरे परदेशातून मुंबईत आल्यावरच अधिक स्पष्ट होईल. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास पहिली निवडणूक मुंबई महापालिकेचीच असेल. मुंबईत नेमकं काय होऊ शकतं?
२००७ च्या निवडणुकांपासून ठाकरे बंधू आमने-सामने आले. मात्र आता राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. पण दोन्ही भावांमध्ये समेट झालीच तर पहिली निवडणूक मुंबई महापालिकेचीच असेल. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस होते आणि भाजप-शिवसेना युती असतानाही भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. मुंबई महापालिकेच्या एकूण जागा २२७ आहेत. शिवसेनेचे ८४ नगरसेवक जिंकले तर भाजपचे ८२ नगरसेवक आले आणि मनसेच्या ७ जागा निवडून आल्या. शिवसेनेची मतांची टक्केवारी होती २८ टक्के आणि भाजपने २७ टक्के मतं घेतली तर मनसेच्या मतांची टक्केवारी आहे ८ टक्के. २०१७ आणि २०२५ या सात वर्षांच्या कालावधीत आता मतदारांची संख्या वाढलेली आहे. मात्र २०१७ ची ठाकरे बंधूंची मतांची आकडेवारी लक्षात घेतल्यास ३६ टक्के मतं होतात. म्हणजे मुंबई विशेषतः मराठी मतांचा टक्का निर्णायक असलेल्या ठिकाणी ठाकरे बंधूंचं एकत्र येण हे सत्ताधार्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
