Raj Thackeray : धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर दुकानांवर मराठी पाट्या लावणं अनिवार्य असताना काही ठिकाणी अद्याप दुसऱ्या भाषेतील पाट्या असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका करत बाळासाहेबांचे विचार म्हणतात मग कारवाई का करत नाहीत? केला सवाल
पुणे, २८ नोव्हेंबर २०२३ : मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर दुकानांवर मराठी पाट्या लावणं अनिवार्य असताना काही ठिकाणी अद्याप दुसऱ्या भाषेतील पाट्या असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका करत बाळासाहेबांचे विचार म्हणतात मग कारवाई का करत नाहीत? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. पुढे राज ठाकरे असेही म्हणाले की, आपलं सरकार हिंदुत्व आणि मराठीबद्दल नुसतं तोंड वाजवायला आहे. कोर्टानं सांगून पण सरकारला मराठी पाट्या करता येत नाही. बाळासाहेबांचे विचार म्हणतात पण अंमलात आणत नाही. त्यापद्धतीने सरकारने पाऊल टाकलं पाहिजे. शासनाचा धाक? कोर्टाची काही भिती वैगरे वाटते की नाही? असा सवाल करत जोरदार फटकारलं आहे.
Published on: Nov 28, 2023 03:42 PM
Latest Videos