‘नकाब’चा ‘जवाब’ जनतेला द्यावाच लागेल, फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले असून नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू असताना मलिकांवरील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावरून मनसेने सडकून टीका केली आहे.
मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले असून नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही”, असे या पत्रात म्हटले आहे. तर यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू असताना मलिकांवरील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावरून मनसेने सडकून टीका केली आहे. राज ठाकरे या पत्रावर म्हणाले, इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? असा सवाल राज ठाकरे यांनी ट्वीट करून केला आहे. इतकंच नाहीतर नकाबचा जवाब मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल, नाहीतर जनता योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.