Raj Thackeray Nashik PC | … ते कुठे लवंडतील माहीत नाही, नाशिकमधून राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणावर?
राज ठाकरे यांना तुमचा पक्ष महाविकास आघाडीसोबत जाणार का? असा सवाल केला यावर बोलताना ते म्हणाले, पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होतेय. कुठे निवडणूक लढवावी, याबाबत चाचपणी करत आहोत
नाशिक, २ फेब्रुवारी २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह मराठी शाळा, महाविकास आघाडीतील प्रवेश, अयोध्या यावर भाष्य केले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना तुमचा पक्ष महाविकास आघाडीसोबत जाणार का? असा सवाल केला यावर बोलताना ते म्हणाले, पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होतेय. कुठे निवडणूक लढवावी, याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत. आम्हीही करतोय. दरम्यान, राज ठाकरे मविआसोबत आले तर घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. तेव्हा राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिले नव्हते तरी ते आले. यावर राज ठाकरे म्हणाले, आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघाडीकडे कोण जाणार? त्यांचाच काही भरवसा नाही. त्यांच्याकडे कोण जाईल. इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते कुठे गेले? असेही राज ठाकरे म्हणाले.