Raj Thackeray : ‘अशी प्रगती नको आम्हाला, मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून…’, राज ठाकरे स्पष्टच म्हणाले
आज जे फ्लायओव्हर्स, जे ब्रीज वगैरे होत आहेत, ते दिसायला छान दिसतंय, पण यातून जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ते आम्हाला नकोय, असे राज ठाकरे एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हणाले.
‘प्रगतीने मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको’, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका यूट्यूब चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विशेष मुलाखत दिली त्यात त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं. यावेळी राज ठाकरे असंही म्हणाले की, शाळेत मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे. आपल्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी पक्षीय, राजकीय मतभेद बाजूला सारून मराठी भाषेकडे बघणं खूप आवश्यक आहे. केवळ मराठी भाषा दिवस साजरा करणं आणि मराठीला अभिजात दर्जा मिळणं म्हणजे मराठी भाषा टिकणार नाही…असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तर महाराष्ट्रात मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला असही राज ठाकरे या मुलाखती म्हणाले.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!

मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
