इंडिन vs घड्याळ… पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष चोरीच्या आरोपांवरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांना टार्गेट करू लागले आहेत. यावरून त्यांना आपल्या इंजिनकडे बघण्याचा सल्लाच अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलाय. पक्ष चोरीवरून कोणाच्या काय भूमिका बघा व्हिडीओ
राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच असल्याचे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या इंजिनाचं बघावं असा सल्लाच अजित पवारांनी राज ठाकरेंना दिला. तर राज ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंचं आहे. तर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष हे शरद पवार यांचेच आहेत, असा दावा करत पक्ष फोडीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधलाय. अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये असताना जेव्हा शिवसेनेची मालकी एकनाथ शिंदेंना मिळाली तेव्हा अजित पवारांनी त्यावर सडकून टीका केली होती. त्यावर मनसेचं उदाहरण देत त्यांच्या एकमेव आमदारानं दावा सांगितला तर मनसे हा पक्ष त्यांना देणार का? असा सवाल अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला केला होता. मात्र आता चिन्ह आणि पक्षावरून अजित पवार आणि मनसे यांच्यात वाद रंगलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
