मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार की नाही? जरांगेंच्या मुंबईच्या पायी मोर्च्याबद्दल काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
मराठा आरक्षणावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. या मराठा मोर्च्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मनोज जरांगे पाटील मुंबईला येईपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा आरक्षणावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. मनोज जरांगे यांचा हा मोर्चा उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, अशी विनंती आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने पोलिसांना मनोज जरांगे यांना हायकोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्याचे आदेश दिले.