उर्फी प्रकरणावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांबाबत आणि तिच्या स्टाईलवर भाष्य केले आहे.
उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आणि तिच्या विचित्र फॅशनवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि उर्फी जावेद विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी उर्फीला पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले, तिची चौकशीही केली.
मात्र या सगळ्यानंतर उर्फीला काही शांत बसवेना… माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगत उर्फीने चित्रा वाघ यांच्याच विरोधात राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले आणि तक्रार अर्ज दाखल केला. उर्फी जावेद प्रकरणात काही राजकीय मंडळींनी उडी घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीदेखील उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत आणि तिच्या स्टाईलवर भाष्य केले आहे. शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेदवर बोलताना भाष्य करणं टाळलं पण तरीही त्यांनी एका वाक्यात यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.