Raj Thackeray यांनी नेमकी काय व्यक्त केली चिंता?; म्हणाले, ‘… ते वेळीच थांबवलं पाहिजे’
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सण-उत्सवांबाबत चिंता व्यक्त केल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांनी एक मार्मिक ट्वीट केले असून ते म्हणाले, 'आपल्या उत्सवाची आणि आनंदाची किंमत आपण मोजतोय' सण-उत्सवांच्या मिरवणुकांतील डीजे, डॉल्बीवर राज ठाकरे यांनी ठेवलं बोट
मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | नुकताच महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात सर्वत्र साजरा झाला. मात्र या उत्सवाला काही ठिकाणी गालबोट लागल्याचेही समोर आले. कुठे डीजे बंद करण्यास सांगितल्याने मारहाण झाली तर कुठे कर्कश आवाजामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी सण-उत्सवांच्या मिरवणुकांतील डीजे, डॉल्बीवर राज ठाकरे यांनी बोट ठेवलं आहे. सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बीभत्स स्वरूप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे, असे आवाहन केले तर सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी, असेही थेट राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले.