Sandeep Deshpande : ‘ए जा रे भैय्या.. अरे XXX’, फोनवरुन धमकी अन् शिवीगाळ; ‘त्या’ कॉलवर संदीप देशपांडे थेट म्हणाले…
मनसे नेते संदीप देशपांडे यांना एका अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ... शिवीगाळ करत संदीप देशपांडे यांना आज्ञाताकडून फोनवरून धमकी, देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...
मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या धमकीप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून यावर त्यांनी टिव्ही ९ मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘असल्या धमक्यांना संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाहीत.’, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून देण्यात आलेल्या शिवागीळवर प्रतिक्रिया दिली आहे. या फोनकॉलसंदर्भात बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, काल रात्री सव्वादहा वाजता मी घरी असताना फोन आला आणि नुसताच शिव्या घालत होता. नंतर पुन्हा एकदा फोन केला. त्याला म्हटलं मी कॉल रेकॉर्ड करतोय. त्यावेळीही तुम्हाला घरी येऊन मारु वगैरे.. असं फोनवरून समोरचा माणूस बोलत होता. पण अशा धमक्यांना घाबरत नाही. माझ्यावर अनेकदा हल्लेदेखील झाले पण मी घाबरणार नाही.. पुढे त्यांनी अशीही माहिती दिली की, काल रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास पोलिसात गेलो आणि एनसी दाखल केली आहे आता पोलीस त्याचा तपास करतील.

मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?

जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड

गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
