सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, ‘पाळलेला कुत्रे… ज्या दिवशी त्याला गप्प करण्याचा विषय येईल तेव्हा…’
मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिकांकडून थेट बँकांमध्ये धडक देऊन बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देत आहे. तर अशी दमदाटी चालणार नाही, असं म्हणत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. राज ठाकरे यांनी मराठीवरून बँकांमध्ये तपासणी करा, असे आदेशच मनसैनिकांना दिलेत. यानंतर मनसैनिकांकडून थेट बँकांमध्ये जात एक निवेदन देत बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवत टीका केली आहे. ‘राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार नाहीत, राज ठाकरेंची टोळकी बँकांमध्ये जाऊन धुडगूस घालते आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना धमकवता, कर्मचाऱ्यांना मारता, तुम्ही न्याय देवता आहेत का? हे चालणार नाही. याला कायदेशीर उत्तर म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना याबद्दल कारवाईचं निवेदन देणार आहे’, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. यावर मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
गुणरत्न सदावर्ते नावाचा कुत्रा कोणी पाळलाय, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पाळलेले कुत्रे छू म्हटलं की भूकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, असं म्हणत मनसे प्रवक्ते योगेश चिले यांची खालच्या पातळीची टीका केली. पुढे ते असेही म्हणाले, गुणरत्न सदावर्ते यांचा पाळलेला कुत्रा असा उल्लेख करत पाळलेल्या कुत्र्यांच्या भूंकण्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष देत नाही. ज्या दिवशी सदावर्तेला गप्प करण्याचा विषय येईल त्या दिवशी आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शांत करू असं म्हणत योगेश चिले यांनी गुणरत्न सदावर्ते यांना थेट इशाराच दिला आहे.

पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच

BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!

'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
