‘तेल लगाने गया…’, L&T च्या सुरक्षा रक्षकाला मायमराठीचा अवमान करणं पडलं महागात, मनसैनिकांचा हिसका; बघा VIDEO
पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल असाच अनादर दाखवला. संतप्त झालेल्या मनसैनिकांनी मनसे स्टाईलने दिला चांगलाच चोप...
मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील पवई येथील ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्याचे पाहायला मिळाले आहे. मायमराठी भाषेचं एक वक्तव्य करून ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अवमान केला. दरम्यान, ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मराठीचा अवमान करणं चांगलंच महागात पडलं आहे. ‘मराठी गया तेल लगाने…’, असं वक्तव्य या सुरक्षा रक्षकाने केलं होतं. या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या सुरक्षा रक्षकाला चांगलाच घडा शिकवला. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर मनसैनिकांनी आपल्या स्टाईने या सुरक्षा रक्षकाला हिसका दाखवला. त्यामुळे आता मराठी भाषेबद्दल वक्तव्य करताना हा सुरक्षा रक्षक अनेकदा विचार नक्कीच करेल. “क्यू मराठी आता नही, में क्यू बोलू. मराठी नही आता मेरे को, जरुरी थोडी हैं, मराठी गया तेल लगाने” असं म्हणत सुरक्षा रक्षकाने मनसैनिकांशी बाचाबाची केली. बघा व्हिडीओ…