AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार? कोण आहेत मनसेचे 9 उमेदवार? त्यांची होतेय चर्चा

लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार? कोण आहेत मनसेचे 9 उमेदवार? त्यांची होतेय चर्चा

| Updated on: Oct 08, 2023 | 11:01 AM

tv9 Special Report | आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कबंर कसली असताना लोकसभेच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार असल्याची चर्चा होताना दिसतेय. लोकसभेसाठी मनसेच्या ९ संभाव्य उमेदवारांची होतेय चर्चा, कोण आहेत ते 9 उमेदवार?

मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मनसेचे 9 उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. मनसेनंही आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केलीय. गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंनी आढावा बैठकाही घेतल्यात. आता जवळपास 9 लोकसभा मतदारसंघात मनसेकडून नाव ठरल्याची चर्चा आहे. ज्यात उमेदवार म्हणून कल्याण-डोंबिवली लोकसभेसाठी आमदार राजू पाटलांचं नाव चर्चेत आहे. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत आणि त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना थेट आव्हान दिलंय. राजू पाटलांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोलूनही दाखवलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उमेदवारच उभे केले नव्हते. तरीही पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. अर्थात अप्रत्यक्षपणे आघाडीलाच मदत करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र आता त्यांची जवळीक शिंदे आणि भाजपशी वाढलीय. पण तूर्तास तरी युती न करता स्वबळावर लढण्याची भूमिका राज ठाकरेंची आहे.

Published on: Oct 08, 2023 11:01 AM