शपथविधीची तयारी पूर्ण, फॉर्म्युलाही ठरला; मोदी सरकारमध्ये कोणाचे किती मंत्री? कोणाची लागणार वर्णी?
मोदींची पंतप्रधान होण्याची हॅट्रिक काही तासांवर आली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची तिसऱ्यांचा शपथ घेतील. भाजपला बहुमत नसल्याने एनडीएच्या मित्रपक्षांचं महत्त्व वाढलंय. त्यामुळे चंद्रबाबू नायडूंची टीडीपी आणि नीतिश कुमार यांचा जेडीयूला मंत्रिमंडळात चांगलाच वाटा मिळेल
भाजप, नरेंद्र मोदी आणि एनडीए यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत एनडीएचे जवळपास १८ जण शपथ घेतील, अशी माहिती आहे. मोदींची पंतप्रधान होण्याची हॅट्रिक काही तासांवर आली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची तिसऱ्यांचा शपथ घेतील. भाजपला बहुमत नसल्याने एनडीएच्या मित्रपक्षांचं महत्त्व वाढलंय. त्यामुळे चंद्रबाबू नायडूंची टीडीपी आणि नीतिश कुमार यांचा जेडीयूला मंत्रिमंडळात चांगलाच वाटा मिळेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीतिश कुमार यांच्या जेडीयूला ३ कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर आंध्रमधून टीडीपी या पक्षाला ४ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदं मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चंद्राबाबूंची मंत्रिपदासह लोकसभेच्या अध्यक्षपदाचीही मागणी आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…