कोल्हापुरात झाडावर दोन दिवसांपासून अडकून पडलेल्या माकडांची अशी केली सुटका

कोल्हापुरात झाडावर दोन दिवसांपासून अडकून पडलेल्या माकडांची अशी केली सुटका

| Updated on: Aug 09, 2022 | 10:46 PM

माणसांप्रमाणेच प्रमाणेच प्राण्यांना देखील पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरात(kolhapur) तब्बल दोन दिवस झाडावर अडकलेल्या माकडांची(Monkeys ) अखेर सुटका झाली आहे. नदी पात्रातील झाडांवर दोन दिवसांपासून अडकून पडलेल्या वानरांची सुटका झाली आहे.

कोल्हापुर : राज्यभर सर्वत्र धो-धो पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाचा कहर कोल्हापुरातही पहायला मिळाला. माणसांप्रमाणेच प्रमाणेच प्राण्यांना देखील पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरात(kolhapur) तब्बल दोन दिवस झाडावर अडकलेल्या माकडांची(Monkeys ) अखेर सुटका झाली आहे. नदी पात्रातील झाडांवर दोन दिवसांपासून अडकून पडलेल्या वानरांची सुटका झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवानांनी वानरांची सुटका केली आहे. भूकेलेल्या वानरांसाठी केळी आणि फळांची व्यवस्था देखील या जवानांनी केली. दोरीच्या साहाय्याने वानरांना बाहेर काढण्यात जवानांना यश आले. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावाजवळ पुराच्या पाण्यात अडकला होता वानरांचा कळप.

Published on: Aug 09, 2022 10:46 PM