‘आपल्या वैचारिक उंचीप्रमाणेच लोकसभेत बोलले; शिवसेना नेत्याचा राणे यांना ‘त्या’ वक्तव्यावरून टोला
यादरम्यान लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आणि भाजपमध्ये गेलेल्या खासदारांच्यामध्ये जोरदार खडा जंगी पाहायला मिळाली. यावेळी खासदार खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023 । सध्या केंद्र सरकारवर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात चर्चा होत आहे. यादरम्यान लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आणि भाजपमध्ये गेलेल्या खासदारांच्यामध्ये जोरदार खडा जंगी पाहायला मिळाली. यावेळी खासदार खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर मागील सगळ्या बाता मारल्या मात्र त्यावेळी तुमचा जन्म ही झाला नव्हता असा टोला लगावला होता. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आणि शिवसेना ठाकरे गटावर टीका केली राणे यांनी यावेळी हे वाघ नाहीत आता मांजर झाले आहेत. हे संपलेत. त्यांची पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही, असं म्हटलं. त्यावर सावंत यांनी देखील घणाघाती टीका केली आहे. पाहा काय म्हणाले अरविंद सावंत राणे यांच्या त्या टीकेवर…