बापट जाऊन आज तीन दिवस होतायत, माणुसकी हा प्रकार आहे का नाही; अजित पवारांनी वडेट्टीवारांना फटकारलं

बापट जाऊन आज तीन दिवस होतायत, माणुसकी हा प्रकार आहे का नाही; अजित पवारांनी वडेट्टीवारांना फटकारलं

| Updated on: Mar 31, 2023 | 3:31 PM

भाजपने आमच्यासाठी कुठे बाय इलेक्शन सोडलं, त्यामुळे आम्ही पुणे लोकसभा लढणार अशी भूमिका त्यांनी जाहिर केली होती. त्यावर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

मुंबई : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे विधन झाल्याचे आता तेथे पोटनिवडणूक लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाना साधत आम्ही या पोटनिवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून समोरे जाणार असल्याचं म्हटलं. तसेच भाजपने आमच्यासाठी कुठे बाय इलेक्शन सोडलं, त्यामुळे आम्ही पुणे लोकसभा लढणार अशी भूमिका त्यांनी जाहिर केली होती. त्यावर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. तर पुणेकरांचे खासदार बापट जाऊन आज फक्त तिसरा दिवस होतोय. लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. एवढी काय घाई आहे काय? माणुसकी प्रकार आहे का नाही? असे खडे बोल वडेट्टीवारांना सुनावत फटकारलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची पंरपरा आहे. जनाची नाही तर मनाची तरी आहे का नाही असे उद्या लोकच म्हणतील.

Published on: Mar 31, 2023 03:25 PM