देवेंद्र फडणवीस २०२४ ला सत्तेत नसणार, ही आमची गॅरंटी; संजय राऊत यांनी पुन्हा डिवचलं
संजय राऊत नागपुरातील संघर्ष यात्रेत बोलत होते. एक फूल दोन हाफ, डबल इंजिनचं सरकार असं नाही तर हे सरकार एक फूल दोन डाऊटफूल असं सरकार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी काय लगावला मिश्कील टोला?
नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात गॅरंटी देण्यासाठी फिरतात पण २०२४ ला देवेंद्र फडणवीस सत्तेत नसणार ही आमची गॅरंटी, असेही म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत नागपुरातील संघर्ष यात्रेत बोलत होते. एक फूल दोन हाफ, डबल इंजिनचं सरकार असं नाही तर हे सरकार एक फूल दोन डाऊटफूल असं सरकार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, या सरकारमध्ये फूल कुणीच नाही. यात फूल कोण असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. या दोघांच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात मोठी क्रांती करायची आहे. आमची संघर्ष करण्याची तयारी आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आणि सरकारवर सडकून टीका केली.

पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर

सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?

ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आयात शुल्कावरून भारताला दिला जबरदस्त झटका
