Sanjay Raut : 27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यावरून आज पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ज्या गृहखात्यावर आहे त्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. पण तसं करण्याची सरकारची तयारी नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी आज भाजप सरकारला पहलगाम हल्ल्यावरून धारेवर धरलं. हे 27 बळी म्हणजे सरकारने घेतलेले नरबळी आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी बोलताना राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, पहलगामचा मानवी संहार हा सरकारच्या गफीलपणामुळे झालेला आहे. सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहून विरोधक काय बोलतात हे ऐकायची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. मात्र त्यांनी आपला बिहारचा पूर्व नियोजित दौरा रद्द नाही केला, हल्ला झाल्यानंतर सर्वात अधि गृह खात्यावर करवाई व्हायला हवी होती. पंतप्रधान मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घेतला पाहिजे असंही राऊत यांनी म्हंटलं.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

