Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांना श्रीकांत शिंदे यांचे चॅलेंज, 'बघु किस मे हे कितना दम...'

आदित्य ठाकरे यांना श्रीकांत शिंदे यांचे चॅलेंज, ‘बघु किस मे हे कितना दम…’

| Updated on: Oct 05, 2023 | 11:46 PM

जेलमध्ये जाण्याच्या भितीने शिंदे गेले असा आरोप आदित्य ठकारे यांनी केला होता. त्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट उत्तर दिलं. कोविडमध्ये कोणाचा हात आहे. कोणी पैसे खाल्ले, खिचडी पण सोडली नाही असअ टोला लगावला. तर. आदित्य ठाकरे यांना 'बघु किस मे हे कितना दम...' म्हणत चॅलेंजही दिलंय.

कल्याण : 5 ऑक्टोबर 2023 | ३०० ग्रॅम खिचडीतील १०० ग्रॅम मिळायची, लाईफ लाईनला टेंडर कंपनी स्थापन व्हायच्या आधीच मिळालं. त्यामुळे जेलमध्ये येणाऱ्या काळात कोणाला जावं लागेल ते कळेल, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय. तुम्ही आमचे नेते असताना आपली सेवा करताना आपल्यासाठी आम्ही काय काय केलं. आमच्यासाठी ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ हे उद्दिष्ठ आहे. पण, आपण मातोश्री १ मधून मातोश्री २ मध्ये कसे गेलात. तुमचा इनकम सोर्स काय असा सवाल त्यांनी केला. तुम्ही कोणावर बोलताय याचं भान ठेवा. आम्ही सत्तेत आल्यापासून काम करतोय. आम्ही अनेक योजना आणल्या. तुम्ही काय केलं. आमचा साधा नगरसेवक घरी बसून काम करू शकत नाही. डोंबिवलीत तुमचं आजोळ आहे. त्यांनी त्या ठिकाणी येऊन लढावं. मग बघु किसमे हे कितना दम असे आव्हान श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले.

Published on: Oct 05, 2023 11:45 PM