राष्ट्रवादीत उभी फूट, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अदृश्य शक्ती...'

राष्ट्रवादीत उभी फूट, पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अदृश्य शक्ती…’

| Updated on: Nov 02, 2024 | 12:46 PM

राजकीय पातळीवर सुरु असलेला संघर्ष आता कौटुंबिक पातळीवर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमध्ये राष्ट्रवादी विभागली गेली. आता तर कौटुंबिक पातळीवर कित्येक वर्ष एकत्र होणारा दिवाळी पाडवा देखील वेगळा साजरा होतोय.

बारामतीमध्ये यंदा पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांचा वेगवेगळा दिवाळी पाडवा साजरा होतोय. शरद पवार हे गोविंदबागेत तर अजित पवार हे काटेवाडीत आपला दिवाळी पाडवा साजरा करताय. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची सकाळपासूनच मोठी रिघ पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्यासोबत गोविंदबागेतील दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे उपस्थितीत आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत काका-पुतणे आमने सामने येणार आहेत. त्यात एक काका पुतणे म्हणजे शरद पवार विरूद्ध अजित पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार…दरम्यान, पवार कुटुंबात होणाऱ्या दोन दिवाळी पाडव्यांसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सर्व दिल्लीतील अदृश्य शक्तीचं यश आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीची एवढीच ताकद घर फोडा आणि पक्ष फोडा.’ बघा व्हिडीओ नेमकं काय केला सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल?

Published on: Nov 02, 2024 12:46 PM