Pune Ambil Odha Protest | खासदार सुप्रिया सुळे यांचा पुण्याच्या आंबिल ओढ्यातील आंदोलकांशी संवाद
आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
पुण्यातील आंबिल ओढ्यातील (Pune Ambil Odha) काही नागरिकांची घरं पाडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणात कोणतंही राजकारण करु नये असं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, ” मी इथे राजकारण करण्यासाठी आले नाही. हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही राजकारण आडवं न आणता हा प्रश्न मार्गी लावावा”

फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?

पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...

पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्

भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
