उदयनराजे व शिवेंद्रराजे आमने-सामने; कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, शिवेंद्रराजे यांचा इशारा, म्हणाले...

उदयनराजे व शिवेंद्रराजे आमने-सामने; कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, शिवेंद्रराजे यांचा इशारा, म्हणाले…

| Updated on: Jun 21, 2023 | 4:34 PM

यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला. यावरून साताऱ्याचं राजकाण आता चांगलंच पेटलेलं आहे. तर हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

सातारा : साताऱ्यातील दोन राजे जागेवरून आज एकमेकांच्या समोर आले आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद उफाळून आला. हा वाद उफाळून आल्याने मात्र दोन राजांची प्रजाच एकमेकांच्या अंगावर गेली. यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला. यावरून साताऱ्याचं राजकाण आता चांगलंच पेटलेलं आहे. तर हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. साताऱ्यातल्या खिंदवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम होता. यावेळी ही जागा आपल्या नावावर असून ती घेता येणार नाही असा पवित्रा उदयनराजे यांनी घेतला. तर त्यांचा विरोध झुगारून शिवेंद्रराजे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. यावरून तेथे दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले. यावरून शिवेंद्रराजेंनी उदयनराजे यांचा जागेच्या मालकिचा मुद्दा खोडून काढत ही जागा बाजारसमितीच्या मालकिची असल्याचे म्हटलं आहे. तर येथे उपबाजार करण्यासाठी शासनाकडूनच जमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. तर जी येथे नुकसान करण्यात आली. त्याविरोधात पोलीसांच तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 21, 2023 04:34 PM