Tv9 Special Report | आधी चोपण्याची भाषा, आता मांडीला मांडी! काय म्हणाले होते उदयनराजे भोसले त्रिवेदी यांच्यावर

Tv9 Special Report | आधी चोपण्याची भाषा, आता मांडीला मांडी! काय म्हणाले होते उदयनराजे भोसले त्रिवेदी यांच्यावर

| Updated on: Aug 10, 2023 | 8:45 AM

तर अविश्वास ठरावरून विरोधकांकडून सरकारवर निशाना सधला जात असतानाच आत्ता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत मात्र राज्यात वेगळी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी अनुद्गगार काढले होते.

मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । देशाची राजधानी दिल्लीत सध्या केंद्र सरकारचे अधिवेशन सुरू आहे. याअधिवेशनात आता सत्ताधारी आणि विरोधकांच्यात जोरदार जुंपलेली पाहायला मिळत आहे. तर अविश्वास ठरावरून विरोधकांकडून सरकारवर निशाना सधला जात असतानाच आत्ता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत मात्र राज्यात वेगळी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी अनुद्गगार काढले होते. ज्यामुळं यांच्यावर टीका झाली होती. तर महाराष्ट्रात त्रिवेंदींविरोधात आंदोलनही झालं होती. त्यानंतर उदयनराजेंनी तर त्रिवेदींना चोपण्याची भाषा करत कोण तो.. टुकारडं.. चपलेनं मारला पाहिजे त्याला.. असे म्हटलं होतं. पण काल तेच उदयनराजे थेट लोकसभेत सुधांशू त्रिवेदी यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. तर त्रिवेदींनी केलेल्या शायरीवर हसतानाही दिसले. यावरून सध्या राज्यात चर्चा होत असून विरोधकांनी आता उदयनराजे यांच्या याभूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. पाहा त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 10, 2023 08:45 AM