उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना फटकारले, थेट म्हणाले…
राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत खेद व्यक्त केला. यासंदर्भात खासदान उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले.
सातारा, ४ जानेवारी २०२४ : राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत खेद व्यक्त केला. यासंदर्भात खासदान उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. प्रभू श्रीराम आणि कोणत्याही युगपुरुषाबद्दल कोणीही विधान करू नये आणि अशी युग पुरुषांबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांवर कडाक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी खासदान उदयनराजे यांनी केली आहे. कारण नसताना राजकरण करत मतभेद निर्माण केले जात आहेत त्यात विकृती पण आहे. यावेळी संत किंवा युगपुरुष हे कधी मांसाहारी होते का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत असं बोलणे ही मोठी शोकांतिका आहे असं देखील खा.उदयनराजे महणाले आहेत.