Varsha Gaikwad : ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
Congress Protest : कॉंग्रेसकडून मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धरपकड सुरू असताना या झटापटीमध्ये खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या आहेत.
ईडी कार्यालयाबाहेरील आंदोलनावेळी खासदार वर्षा गायकवाड जखमी झालेल्या आहेत. पोलिसांच्या झटापटीमध्ये खासदार वर्षा गायकवाड या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. या विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहेत. मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत काँग्रसच्या खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

