MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, MPSC ने विद्यार्थ्यांची ‘ही’ मोठी मागणी केली मान्य
VIDEO | विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांना अखेर यश, विद्यार्थ्यांची कोणती मागणी झाली मान्य?
पुणे : गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. असे ट्विट करून मंडळाने माहिती दिली आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये, अशा प्रमुख 4 मागण्या आंदोलकांच्या आहेत.