Special Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?

Special Report | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?

| Updated on: Jan 23, 2022 | 11:36 PM

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सेट नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याविरोधात आंदोलन देखील करण्यात आले.

नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) कार्यकर्त्यांचा दावा आहे की, आज सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. परीक्षा केंद्रावरील स्टाफने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपनं संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी (Collector of Nagpur) तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. परीक्षा केंद्रासमोर ठिय्या आंदोलनावर बसले. अभाविपच्या संबंधित कार्यकर्तीचा आरोप आहे की परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने (Head of Center and a Clerk) तिच्यासमोर प्रश्न संचाचे तीन सीलपैकी एक सील आधीच फोडण्यात आल्याचे मान्य केले. या घटनेनंतर अभाविपचे कार्यकर्ते आंदोलनावर बसले. संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.