MSRTC Protest : ‘… अन्यथा आंदोलन करणार’, मार्च महिन्यांच्या वेतनावरून एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून एसटी बँकेला फक्त 40 कोटी रूपयेच देण्यात आल्याने पगार रखडणार असा संभ्रम निर्माण झाला असताना एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56 टक्केच वेतन जमा झाल्याची माहिती मिळतेय.
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56 टक्केच वेतन जमा झालं आहे. एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी देण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची रक्कम अपुरी असल्याचे कळतंय. परिणामी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56 टक्के वेतन जमा झालं असलं तरी उरलेलं 44 टक्के वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी सध्या चिंतेत असल्याचे पाहायला मिळतंय. तर राज्यभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपेक्षा ही रक्कम पुरेशी नाही. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी सरकारकडून एसटी बँकेला देण्यात आलेला 40 कोटी रूपयांचा हा निधी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याइतका पुरेसा नाही, असं मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केलं होत. तर दुसरीकडे मार्च महिन्याचं वेतन अर्धच आल्याने एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसतंय. पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारच कामगार संघटनांकडून देण्यात आला आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
