एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, 'या' तारखेपासून आझाद मैदानावर करणार आंदोलन?

एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, ‘या’ तारखेपासून आझाद मैदानावर करणार आंदोलन?

| Updated on: Feb 21, 2023 | 9:40 PM

VIDEO | गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची संघटनाही करणार आत्मक्लेश आंदोलन, काय आहे कारण?

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने येत्या २८ फेब्रुवारीपासून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. तर शासनाकडून मागण्या मान्य न झाल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची संघटनाही आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासह इतर मागण्या शासनाने मान्य न केल्याने त्याच मागण्या घेऊन राज्यभरातील एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारी आहेत. दरम्यान, डिसेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समस्येवर गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर व्यापक बैठक घ्यावी, अन्यथा लढा देण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला होता.

 

Published on: Feb 21, 2023 09:37 PM