ST Bank : गुणरत्न सदावर्ते यांना सर्वात मोठा झटका, एसटी कर्मचारी बँकेतील 17 संचालक…
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक एसटी कर्मचारी सोसायटीचे संचालक सदावर्तेंची साथ सोडणार आहेत. कर्मचारी सोसायटीच्या सर्व १७ संचालकांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.या सगळ्या संचालकांचा एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश होण्याची शक्यता
मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपूर्वी ST कर्मचारी बँकेत वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला होता. एसटी कर्मचारी बँकेचे १९ पैकी १४ संचालक गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात होते. मात्र आता सदावर्ते यांना आणखी मोठा झटका बसणार आहे. कारण जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक एसटी कर्मचारी सोसायटीचे संचालक सदावर्तेंची साथ सोडणार आहेत. कर्मचारी सोसायटीच्या सर्व १७ संचालकांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.या सगळ्या संचालकांचा एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे सर्व पक्षप्रवेश केले जाणार आहेत. त्यामुळे सदावर्तेंना मोठा धक्का बसणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी बँकेत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या आठवड्यात संचालक मंडळाच्या बैठकीत ५ संचालकांनी हजेरी लावली होती. तर १४ संचालक हे गैरहजर असून ते बैठकीच्या आधीपासून नॉट रिचेबल होते, अशी माहिती समोर आली होती.